महाराष्ट्रात पेटले डॉक्टर सप्लाय बंदीचे आंदोलन,रिटेलर ला न्याय मिळेपर्यंत माघार नाही -आशिषभाऊ हांडे

पुणे 30 डिसेंबर 2018 : रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी राज्यात डॉक्टरांना होणाऱ्या बेकायदेशीर औषध पुरवठ्याच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे 


राज्यात औषधें ठेवण्यास व विक्रीस परवानगी नसलेल्या हजारो डॉक्टरांना घाऊक औषध विक्रेत्यांमार्फत औषध पुरवठा केला जातो आणि या औषधांची दुकानेच अनेक क्लिनिक मध्ये थाटलेली आहेत ,या गोष्टीचा थेट परिणाम हा रिटेल मेडिकल स्टोअर्स च्या व्यवसायावर होतो तसेच अनेक ठिकाणी नशेच्या बाजारासाठी सुद्धा हा औषध साठा वापरला जातो आणि म्हणूनच आम्ही हे आंदोलन पुकारले आहे अशी माहिती रिटेल केमिस्ट ने ते आणि RCDA चे उपाध्यक्ष शशांक म्हात्रे यांनी दिली 


या बेकायदेशीर औषध पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करावी तसेच त्यांचेवर कारवाई व्हावी यासाठी राज्यातील 40000 रिटेलर मेडिकल स्टोअर्स मालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे 


आंदोलनाच्या पाहिल्या टप्प्यात एफ डी ए च्या ऑफिसर ला निवेदने देने व कारवाईची मागणी करणे असे स्वरूप आहे ,परंतु जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 फेब्रुवारी पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शशांक म्हात्रे यांनी दिला 


हे आंदोलन संस्थापक सचिन भालेकर,आशिष हांडे कार्यध्यक्ष आणि उपाध्यक्ष शशांक म्हात्रे यांच्या नेतृत्वात केले जाईल असे संस्थेचे प्रवक्ते संदीप हिंगे यांनी स्पष्ट केले 

रिटेलर च्या अस्तित्वाची ही लढाई असेल असे रिटेलर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले


हजारो रिटेलर ने आंदोलनाला पाठिंबा दर्शवित तसे पत्र RCDA कडे पाठविले आहे.


zxczxcxz

2019-11-27 zxczxczx

कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन निवडणुकीत RCDA लढविणार 2 जागा

2019-03-18 MSCDA चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेच्या निवडणुकी मध्ये 2 उमेदवार उभे करत RCDA ने MSCDA लाच उभे आव्हान दिले आहे असे मानले जातेरिटेलर... Read More

डॉक्टरांनी औषधे विक्री करणारे याला पुरवठा करणारे घाऊक विक्रेते जबाबदार,अश्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत -रिटेल केमिस्ट अध्यक्ष सचिन भालेकर

2019-01-02 पुणे: 1 जानेवारी 2019 रोजी डॉक्टर सप्लाय बंद करावा या मागणीसाठी रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सहायक आयुक्त अन्न आणि औषधी प्रशासन पुणे याना... Read More

महाराष्ट्रात पेटले डॉक्टर सप्लाय बंदीचे आंदोलन,रिटेलर ला न्याय मिळेपर्यंत माघार नाही -आशिषभाऊ हांडे

2018-12-30 पुणे 30 डिसेंबर 2018 : रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी राज्यात डॉक्टरांना होणाऱ्या बेकायदेशीर औषध पुरवठ्याच्या विरोधात आंदोलन... Read More