डॉक्टरांनी औषधे विक्री करणारे याला पुरवठा करणारे घाऊक विक्रेते जबाबदार,अश्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत -रिटेल केमिस्ट अध्यक्ष सचिन भालेकर

पुणे: 1 जानेवारी 2019 रोजी डॉक्टर सप्लाय बंद करावा या मागणीसाठी रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सहायक आयुक्त अन्न आणि औषधी प्रशासन पुणे याना निवेदन देण्यात आले 


1 तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आयुक्त मा पाटील साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेत दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले 


डॉक्टर सप्लाय म्हणजे औषध क्षेत्राला लागलेली कीड आहे असे प्रतिपादन यावेळी अध्यक्ष सचिन भालेकर यांनी केले 


रिटेल केमिस्ट ने आंदोलन जहोर केल्यानंतर आपल्या होलसेलर वर कारवाया होऊ शकतात या भीतीने डॉक्टरांवर कारवाया करा अशी मागणी करत सी ए पी डी चे सदस्य आणि पदाधिकारी सुद्धा एफ डी ए ला पोहचले परंतु प्रशासनाने तुमचे होलसेलर सदस्यांनी डॉक्टर सप्लाय बंद करू असे अंडरटेकिंग द्यायला हवे असे सूनवल्याने पदाधिकाऱ्यांची बोलती बंद झाली,विशेष म्हणजे डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी करतानाच या पदाधिकाऱ्यांनी होलसेलर वर कारवाई बाबत मात्र मौन घेतले 


रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ने हाती घेतलेले हे आंदोलन डॉक्टर सप्लाय संपूर्ण थांबेपर्यंत सुरू राहील तसेच जर 15 फेब्रुवारी पर्यंत मागण्या मान्य न झालेस एफ डी च्या कार्यलयासमोर धरणे आंदोलन सुरू केले जाईल असे कार्यध्यक्ष आशिष हांडे यांनी यावेळी स्पष्ट केले 


सी ए पी डी सदस्य आल्यानंतर तुम्ही यांचा पाठिंबा घेत आहात का असे विचारले असता "शेत खाणाऱ्या कुंपणावर शेतकार्याने भरवसा कसा ठेवायचा" असे मार्मिक उत्तर देत सचिन भालेकर यांनी याबाबत जास्त बोलणे टाळले 


zxczxcxz

2019-11-27 zxczxczx

कोल्हापूर केमिस्ट असोसिएशन निवडणुकीत RCDA लढविणार 2 जागा

2019-03-18 MSCDA चा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेच्या निवडणुकी मध्ये 2 उमेदवार उभे करत RCDA ने MSCDA लाच उभे आव्हान दिले आहे असे मानले जातेरिटेलर... Read More

डॉक्टरांनी औषधे विक्री करणारे याला पुरवठा करणारे घाऊक विक्रेते जबाबदार,अश्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत -रिटेल केमिस्ट अध्यक्ष सचिन भालेकर

2019-01-02 पुणे: 1 जानेवारी 2019 रोजी डॉक्टर सप्लाय बंद करावा या मागणीसाठी रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सहायक आयुक्त अन्न आणि औषधी प्रशासन पुणे याना... Read More

महाराष्ट्रात पेटले डॉक्टर सप्लाय बंदीचे आंदोलन,रिटेलर ला न्याय मिळेपर्यंत माघार नाही -आशिषभाऊ हांडे

2018-12-30 पुणे 30 डिसेंबर 2018 : रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी राज्यात डॉक्टरांना होणाऱ्या बेकायदेशीर औषध पुरवठ्याच्या विरोधात आंदोलन... Read More